^°MY POEM°^
आज परत तुझी
आठवण येऊन गेली,
डोळ्यात थोडस
पाणी देऊन गेली.
आज परत डोकं
गुरफटून गेली,
आणि परत तुझी
आठवण येऊन गेली.
आज हृदयाने पुन्हा
धक - धक केली,
अन् परत तुझी
आठवण येऊन गेली.
आज हवा ही झाली मंद
अन् शांत झाल्या वेली,
आणि परत तुझी
आठवण येऊन गेली.
तू काही माझ्या जीवनी
नाही आली,
पण तुझी आठवण
मात्र येऊन गेली.
सखे!तुझी आठवण मात्र येऊन गेली.
Waghmode Rahul