Sunday, 26 May 2024

             दिनांक 23-एप्रिल जागतिक पुस्तक दिन, पुस्तकांबद्दल काही.

open video please click here

https://drive.google.com/file/d/1IplX4qZlUNVxY_7lRKHpGy7eSjEaKQgw/view?usp=drivesdk

Monday, 5 September 2022

दुबळी माझी झोळी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,


हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,

चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,


एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,


महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,

गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,


गोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..


होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,

सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा


अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.

~ग. दि. माडगूळकर





Saturday, 23 July 2022

Rang maza vegla


 ~ vinda karandikar

कविता आणि लेख सोबतच

अंधाराच्या काळोखात

मी काही पाहत आहे,

नात्यांच्या स्पष्टी करणात

मी मागे सरत आहे.


बा,कसे विसरतात माणसे

नवीन माणसे भेटली की,

क्षणात होतात परकी

हातांच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली.


हल्ली,प्रेम पाहण्याच्या

नादात कुठे पाहतो आपण प्रेम त्या आईवडिलांच त्यांनी केलेले उपकार,त्यांचा त्याग म्हणजे तो उपकार त्याग न फिटण्यासारखाच.मीच काय जगातील कोणताच अपत्य आपल्या आईवडिलांचा उपकार फेडू नाही शकत.

                                                                       या जगाच्या कानाकोपऱ्यात बरेच फसवे माणसे मिळतील स्वतःचा स्वार्थ साधून घेतील आणि हे मी बऱ्याचदा अनुभवलय सुद्धा की स्वार्थ साधला की तू कोण आणि मी कोण आणि आजच्या घडीला हेच चाललय "जोडीतो माणसाशी माणूस तो म्हणजे ' स्वार्थ '"

                                                    आनंद आहे मला किही दुनिया, मैफील, मान,अपमान,खरे,वाईट,गुण,दुर्गुण फार लवकर कळायला लागले आणि इतरांनी केलेल्या अपमानाचा,हेटाळणीचा जेव्हा मनावर परिणाम होऊ लागला तेव्हा समजल की आपल्या बापाचं पण हृदय जड होत.'जड' म्हणजे पोलादासारख पाषणासारख न पाझरणार पण लेकरासाठी माय भीमेच्या पाण्यासारख.

                                                          सांगायचं एवढच की प्रेम शोधण्याच्या नादात आपण आपल खर प्रेम हरवत चाललोत.ज्या अर्थी आपल्याला वंशाचा दिवा ,वंशाची पणती म्हतल आहे.त्याअर्थी शेवटी त्यांना चटकेच देणार असाल तर त्याला काही अर्थ आहे का?हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे आणि तो प्रतेकाला पडावा एवढीच विठूरायांकड प्रार्थना.

                                                          खूप दिवसांनी कविता लिहायला काढली होती,पण तीच कधी लेखात रूपांतर झालं कळलच नाही,मनात खूप वादळे सुरू असली की असच होत.असो,कविता म्हटल की तिचा शेवट करावा लागतो.तर तोही करतोच मी;


अंधाराच्या काळोखात

मी पाहण' टाळणारच 'आहे,

नात्यांचं स्पष्टीकरण देणं

मी ' बंदच ' करणार आहे

                                                                                                          ~ Rahul Waghmode 













Friday, 7 May 2021

सांज भूलावते

सांज भूलावते अशी 
थोडे सावरूनी पंख ...
तिच्या दाटल्या दुःखात
कूणी वाजविले शंख .. 

भवताल मोकळला असा
टाकूनिया धावा .... 
तिच्या पदराचा ठाव
पळे शोधाया विसावा ... 

एक बाहूली सोंगात
जशी अलवार नाचे ....
दूर सारून पहाड
दुःख झाकते कूणाचे ....

उभा साजण दारात
सांजवेळीच्या प्रहरी ...
पाऊसाचे रानबंध
उगाचच फेर धरी ...

Sunday, 21 March 2021

तो बाप माझा

त्याच्या हाताच्या जखमांनी 

माझ्या मनाला चटका लागला,

तो बाप हो माझा 

कधी ना सुखी वागला.


त्याने माझ्या सुखासाठी 

स्वतःची सुखे जाळली,

बाप हो तो माझा 

त्याने हार कुठे मानली.


तो एकच धडा शिकवि,

कष्ट चुकवी तो 

आयुष्य मुकवी,

कष्ट करे तो आयुष्याला सुखवी.


पुरंदरचा कडा तो 

पाषाणाचे हृदय त्याचे,

तो माझ्या समोर हजार वेळा तुटला 

पण कधी कोणा समोर नाही झुकला.


त्याच्या फाटलेल्या पायांच्या 

भळीतून जेव्हा रक्त ओसरे,

तेंव्हा हृदयाला एक 

वेगळाच पाझर फूट.

तो मज सांगे "पायांच्या रेषेच काय रे 

हा तर हातांच्या रेषेचा खेळ असे.

Mr.Rahul Waghmode

F.Y Eng













Saturday, 9 January 2021

काय कमावलं..?

      

        पाऊलवाटेने चालत होतो मी माझ्या गावाचा रस्ता,मध्येच मला माझी शाळा आडवी आली शाळेने विचारले "काय कमावलंस आणि काय गमावलंस" मी उत्तर देताना निशब्द झालो आणि क्षणभर विचार करून म्हणलो की - मेहनतीचे पैसे,आरामीचे चार घास,राहण्यासाठी घर.मी सांगायच्या अगोदर शाळेने प्रश्न विचारला काय गमावलंस? माझ्या मनात पुन्हा उत्तरांची भटकंती सुरू झाली.थोड थांबलो आणि म्हणलो "तुझ्या सावलीत घालवलेली दिवस,तू दिलेली मित्रं मैत्रिणी,तू दिलेला पोटभर खाऊ,तुझ्या जवळ बांबूने मारणारे शिक्षक आणि तुझ्या सहवासात हसलेल ते निरागस हसू"आणखीन बरेच काही सांगायच्या आधी डोळे भरून आले.पुन्हा तिच्या सावलीत जाऊन बसलो.पण सोबत नव्हते ते मित्र मैत्रिणी,बांबूने मारणारे शिक्षक अन् चेहऱ्यावरचं निरागस हसू....😔


~mr.Rahul Waghmode

             दिनांक 23-एप्रिल जागतिक पुस्तक दिन, पुस्तकांबद्दल काही. open video please click   here https://drive.google.com/file/d/1IplX4qZ...