सांज भूलावते अशी
थोडे सावरूनी पंख ...
तिच्या दाटल्या दुःखात
कूणी वाजविले शंख ..
भवताल मोकळला असा
टाकूनिया धावा ....
तिच्या पदराचा ठाव
पळे शोधाया विसावा ...
एक बाहूली सोंगात
जशी अलवार नाचे ....
दूर सारून पहाड
दुःख झाकते कूणाचे ....
उभा साजण दारात
सांजवेळीच्या प्रहरी ...
पाऊसाचे रानबंध
उगाचच फेर धरी ...