आयुष्याने खूप काही
शिकवलं,
सुखाची व्याख्या शिकवून
दुःखाचे धडे शिकवले.
आयुष्याने बालपणात
अबोल बोल शिकवले,
अन् तारुण्यात
निशब्द शब्द शिकवले.
विश्वासाच्या दुनियेतील
महापूर मी,
आयुष्याने कोण
कोणाचे शिकवले.
गगन झेप मन
अन् अनंत स्वप्न माझे,
पण आयुष्याने ठेच
लागलेले पाय दाखवले.
शेवटी आयुष्य सरता चार
भाईंच्या खांद्यावर मी,
पण रडता रडता
आयुष्याने जगणं शिकवलं.
Mr.Rahul Waghmode