Sugran
विहिरीवरच्या बोरीलालटकले घरटे सुंदर
त्यात एक
चिमणी सुगरण.
दाटून आले मेघ
वाऱ्याला आला वेग,
चिमणीने दिली
अंडी घरट्यात तीन.
काही दिवस उलटून गेले
परत ढग दाटून आले
विजांचा कडकडाट झाला,
आणि त्यातच अंडे फुटून
पिलांचा जन्म झाला
सुटली थंडगार हवा
पिल्ली पंखाखाली झोपी गेली,
सुगरणीला मात्र थंडी
वाजून आली.
आता मात्र पिल्ली
होऊ लागली मोठी,
सुगरण आणू लागली
त्यांच्यासाठी दाणे छोटी-मोठी
आता पिल्लांना पण फुटले पंख
हवा पण होती संथ,
पिल्लांनी झेप घेऊन पसरविले पंख
उडू लागले ते उंच उंच.
पण उडता उडता
त्यांनी एक चूक केली,
घरट्याला अन् सुगरणीला
सर्वजण विसरून गेली.