My poem
पहा माणसात देव.
मी पाहतो
माणसात देव,
कधी कधी तुम्ही
पण पहावा.
संतांना तर
दिसतोच देव,
कधी कधी आंधळ्यांना
पण दिसावा.
कधी कोणाच्या मनात
नसतोच अहंकार,
कधी कधी तुमच्यात
पण नसावा.
वरून तर दिसतो
प्रकाश खूप,
कधी कधी माणसांच्या
मनात पण दिसावा
ढगाला तर फुटतोच
पाझर,
कधी कधी माणसाच्या
हृदयाला पण फुटावा.
R.S.Waghmode