एकांतवास
आज अचानक वाटले
की कोणीच नाही आपले,
असते कोणी आपले तर
डोळ्यात अश्रू नसते दाटले.
आज फिरत होतो एकटा
नव्हतो मी माणसात,
एक होता माझ्यासोबत
तो म्हणजे एकांतवास.
धावणारे मन म्हणत होते
चल अजून एकांतात,
राहू नको इथे
मतलबी माणसांत.
स्वतःला सावरून आलो
मी माणसांत,
पण ते असतात दूर
मी माझ्या एकांतात.
पाणावलेले डोळे अन्
तुटलेले हृदय पण
मला म्हणत, राहु नको इथे
जा पुन्हा एकांतात
जा पुन्हा एकांतात.
😔
R.s. waghmode