बाप विठ्ठल
आषाढी निमित्त
जमले वारकरी,
माय भीमेच्या तीरी
वसली देवाची पंढरी
ठायी ठायी पसरला
गजर नामाचा,
कोणी करे नामाचा
तर कोनी करी चोखाचा.
अखंड तीर्थाच स्थान
माय चंद्रभागा,
माय तीच माझी
आणि बाप तो विठ्ठल राजा.
देवाचे ते सावळे रूप
तेच वारकऱ्यांचे सुख,
जाता पंढरीशी दूर
त्यांना वाटे दुःख.
यावी लवकर परत आषाढी
यावे वारकरी
यातच माझे सुख,
येईल परत पहायला
आवडीने "श्री" मुख.
!!विठ्ठल जय जय विठ्ठल!!
R.s.waghmode