अधुरा संसार
नाही झाला संसार
नाही झाला संसार
पूर्ण कोणाचा,
संसारात पडलेला
कोणच नाही मानाचा.
माझा विठुराया पडला
होता संसारात,
पण होऊन थोडे भांडण तू
त्या कोपऱ्यात मी या कोपऱ्यात.
माझ्या तुकाच्या बाबतीत
पण तेच,
लागता वेड नामाच
सोडला अर्धवट संसार.
येथे संसार कोणाचा
झाला पूर्ण,
दाखवून द्या मज
मी देईल तुम्हाला सुवर्ण.
येथे संसार कोणाचा
झाला पूर्ण,
दाखवून द्या मज
मी देईल तुम्हाला सुवर्ण.
शेवटी भातुकलीच्या खेळामधली
राजा राणी सुद्धा अर्धवट जातात,
अन् तेच पाहून
पाडगांवकर गातात-
भातुकलीच्या खेळामधली
राजा आणि एक राणी,
अर्ध्यावरती डाव मोडला