"मी माझ्यातला मी"
मी माझ्यातला मी
कधी कळलोच नाही कोणाला,
मग मी शब्दांना जाळून
कवटाळले मौनाला.
दुनियेची रीतच वाईट
खाऊ देणारच नाही घास कष्टाचा,
खूप झाले आता कधी भरणार
घडा यांच्या पापाचा.
झाली हो फिरून प्रेमवारी
कोण पाहत ओ गरिबाच्या प्रेमाला,
सर्व तर पहानारच झाली
उमलत्या गुलाबाच्या काळीला.
लिहिता दोन शब्द
आली भरून आसवांचे दुकाने,
नांदू द्या रे माणसांनो
माणसाला सुखाने.
मी माझ्यात नाही
कधी शोधलो तर बघा कोणाला,
आणि शोधल्यावर परत एकदा
कवटाळील मौनाला.
Mr.Rahul Waghmode