भरता ओंजळ आसवांची
मजला आठवे गाव तिचे,
भरलेले स्वप्न तिच्यासोबत
आज राहिले रिते रिते.
ओढले जरी पाऊल गावाकडे तुझ्या
तिथे मजला तू न दिसे,
खाल्लेले चार घास सोबत तुझ्या
आज पोट रिते रिते.
भरलेली शाळा आपली
वर्गात तुझा डेक्स दिसे,
ती शाळा आणि डेक्स
आज वाटे रिते रिते.
बोलता बोलता करायचो
मन मोकळे तुझ्यासव,
आज मन आहे भरून
पण वाटे रिते रिते.
पेलता नयनांचा भार
पुढे झोप दिसे,
आणि झोपल्यावर पडे
स्वप्न सुद्धा रिते रिते.
गेलीस तू गाव सोडून
रातरीच्या हिंडोळ्यावर तुझेच रूप दिसे,
गेलीस! जा,
पण तुझ्यावाचून गावच राहिले रिते रिते.
~mr.Rahul Waghmode
• Click Here🎧to listen.