मकरसंक्रांतिच्या हार्दिक
शुभेच्छा.
तू तीळ मी गूळ व्हावं
नात्यामध्ये गोडव्याला भरावं
सार काही अलबेल करत
सर्वाना कायम बांधून ठेवावं
थोडंस कधीतरी एकमेकांवर
हक्क दाखवत आपण रुसावं
एकमेकांना चिडवत राहत
नंतर एकत्र येत भरभरून हसावं
खटके उडाले तरी आपण
नात्यांना अलगद सावरावं
एकमेकांवर रागावून पण
एकमेकांना आपण जपावं
खरच तू तीळ नि मी गूळ व्हावं
गोड गोंड राहून नातं खुलवावं
तीळगुळासारखेच सोबत राहत
सर्वाना सुखाचा आस्वाद देत रहावं . .
Happy Makar
Sankranti🙏🏼