पाउलवाटेवर त्या गेलो ,
बोरीचे झाड तेच होते,
फरक इतकाच होता,
झाडाला बोरही नव्हते ! !
डींक बाभूळ फुलांचा,
मन चौखूर शोधीत होते,
डोळ्यांना मात्र फक्त तेव्हा,
काटेच बोचत होते ! !
पाणवठ्यावर त्या गुरांच्या,
घुंगरू सांडले होते,
डोळ्यात फांदीवरल्या,
दवबिंदू गोठले होते ! !
सुकवूनी वारे नभांना,
एकाकी निशब्द होते,
सुपही माजघरात तेव्हा,
जात्यावर झोपले होते ! !