Wednesday, 5 February 2020

-•जगून घे अंधारात•-

जगून घे अंधारात
उजेडात फार धुके आहेत,
धुक्यात टपलेल्यांना खूप
सारे मोके आहेत.

भले जगून अंधारात
डोळे सुजतील फार,
पण धुक्यात टपलेले करणार
नाहीत आपलेच आपल्यावर वार.

तू रहा दुनियेची दूर
होऊ दे प्रवास संथावसा,
गोड बोलून मारणाऱ्यापेक्षा
बरा आहे एकांतवास.

चांगल्या लोकांची संगत राहू दे
बोलतील कडू शब्द चार,
पण त्याला नाही म्हणता
येणार शब्दांचा मार.

हल्ली हल्ले सुद्धा होत नाहीत
हत्यारांसोबत फार,
हत्यारांपेक्षा जास्त शब्दच
होतात कार.

म्हणतात शब्दच जोडतात
शब्दच तोडतात
तोडण्यापेक्षा मी म्हणतो -
जगून घे अंधारात 
उजेडात फार धुके आहेत,
धुक्यात टपलेल्यांना खूप
सारे मोके आहेत.
~mr.Rahul Waghmode


             दिनांक 23-एप्रिल जागतिक पुस्तक दिन, पुस्तकांबद्दल काही. open video please click   here https://drive.google.com/file/d/1IplX4qZ...