-•स्वप्न तुझेच•-
काळया बेधुंद राती
काळया बेधुंद राती
मी तुझेच स्वप्न पाहतो,
गालावर पडलेली खळी तुझ्या
त्यात जीव रमतो.
रात्रीच्या चंद्रासारखे
रूप तुझे साजूक,
घेऊन मला स्वप्नी
तू पण जोड धागे नाजूक.
धागे जोडताना
गा एक आन
तू माझी मी तुझा
मग आपलेच हे राण.
नाते तोडू नको
तोडायला आहे दुनिया खंबीर,
आणि तोडलेस तर सांगतो
विषय होईल गंभीर.
विषय गंभीर होण्यापेक्षा-
आठवून थोडेफार
स्वप्नात रंग भरिन
तू होणार नाहीस माझी
तरीही प्रेम तुझ्यावरच करीन.
~ Rahul waghmode