Sunday, 12 April 2020

#onesided


हो मध्यरात्र झालीय
झोप नाही लागत,
विचारशील का?
का,तर तुझ्या आठवणीने
शिरकाव केलाय मनात.

सखे!तुझ्या सहवासात
घालवलेली रात्र
माझ्या खांद्यावर मान
ठेऊन झोपली तू
बस् मला हेच पहायचय
तू हो माझी,मग देवाकडे तुलाच मागायचय

तुझ्या त्या चंदेरी
शब्दांच्या जाळ्यात मला परत अडकायचय,
लाजनारी नजर तुझी
त्याच कारण बनायचय.

होशील अथवा न होशील
नशिबाचा खेळ सारा,
पण तुला शेवटपर्यंत
आपला मानणार हा मंनबावरा.

बस् रे वेड्या मना
उगाच एवढी रात्र जागलीस,
झोपून तरी काय उपयोग
स्वप्नात पण तूच आली असतीस.


Click To Listen Song.
Album.Sanam Teri Kasam.








Mr.Rahul waghmode
✍️♥️🙏🏼

             दिनांक 23-एप्रिल जागतिक पुस्तक दिन, पुस्तकांबद्दल काही. open video please click   here https://drive.google.com/file/d/1IplX4qZ...