Monday, 27 April 2020

-•आत्मकविता एका बापाची•-


जळत्या ढळत्या
स्वप्नांचा मी हुंदकेकरू,
आणखी किती दिवस
जगण्याच्या नादात मी मरू.

माय माय नाही
बाप बाप नाही,
इथे कोणीच नाही माझे
कुठपर्यंत वाहू मी त्यांचे ओझे.

जगण्यातल्या जगण्यात
काहीच अर्थ उरला नाही,
हो सर्व माझे पण
मी कुणाचाच नाही.

जगण्याच्या या वारुळात
सतत घुटय माझा श्वास,
घेवू दे देवा 
तू मला शेवटचा मोकळा श्वास.

नाही,नको!नंतर कोण
वाहणार माझ्या कुटुंबाचे ओझे,
घुटू दे श्वास माझा
तरी मी जगणार वारुळात जीवन माझे.


~ mr.Rahul Waghmode

In Lockdown Extra:-
Sub-pdf Book.
Name-aadhunik bodhkatha.
Writter-Ulahas Hari Joshi.
Powered by-Eshahity.
Read/Download
🙏🏼

             दिनांक 23-एप्रिल जागतिक पुस्तक दिन, पुस्तकांबद्दल काही. open video please click   here https://drive.google.com/file/d/1IplX4qZ...