Tuesday, 5 May 2020

अखेरचा श्वास

आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व...

कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव...

तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील...

मान खाली घालशील
शरमेने...

खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली....

किणाऱ्यावर पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने...

हे करतांना क्षणभर का होईनात
पण....

आठवेल का रे तुला
माझा खांदा....?

घामांच्या धारांतून वाहणारा माझाच
अंश तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत....

तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला.....?

सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा - नागडा माझा देह , उकळून घेशील
भाजण्याआधी.....

जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील , अखेरचा.....

माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही.

             दिनांक 23-एप्रिल जागतिक पुस्तक दिन, पुस्तकांबद्दल काही. open video please click   here https://drive.google.com/file/d/1IplX4qZ...