मेघ आले
मेघ आले
काळोख पसरला,
पण वेडा
वरुणराजा नाही बरसला.
पाऊस येईल म्हणून
नांगडीत होतो जमिनीला,
पण फटक्यामाग फटका
मारीत होतो सर्जा राजाला.
मशागत चांगली होईल म्हणून
दाबीत होतो नांगडाला,
अन टीपी टीपी
घाम अर्पण करत होतो त्या मातीला.
पाऊस येईल म्हणून
पैसा पेरणीत खर्चला,
मात्र पाऊस माझ्यावर
कोपून वेगळीकडच बरसला.
होळ लागलेल्या झाडावाणी
सर्व पीक करपला,
पण वरूनराजा
नाही बरसला
हवेतील ऑक्सिजन
ही संपला,
त्याचं कारण
माणसांनीच जंगल कापला
म्हणूनच वेडा वरूनराजा नाही बरसला
R.s waghmode